पुणे,दि.०८ :- पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील पुण्यात काही दिवसांपूर्वी अवैद्य धंद्यांचा सुसोळा पाहण्यास मिळत होता व पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारलाचे चित्र पाहण्यास मिळल आहे व काल झालेल्या कारवाई विमाननगर, येथील अमायरा स्पा,सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत ६ पिडित महिलेची सुटका केली, तर स्पा मसाज सेंटर चालविणाऱ्या मालक व मॅनेजर सह ४ जणांना अटक केली. ही कारवाई मंगळवार (दि.०२) करण्यात आली. व स्पा मालक व मॅनेजर वर गुन्हा दाखल केली आहे. याबाबत विरूध्द विमाननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं २१२ / २०२३ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. विमाननगर येथे एका इमारतीत अमायरा स्पा, नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि- हाईक पाठवून खात्री केली असता, मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ स्पा सेंटरवर छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तेंच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.
सदर ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,२८,५००/- (एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे ) रू किचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व स्पा मॅनेजर व पाहिजे आरोपी स्पा चालक असे एकुण ०४ इसमांविरूध्द पुढील कारवाई करीता विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, रेश्मा कंक, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.