पिंपरी,दि.०४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.३ रोजी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे सुधारितनुसार, अतिरिक्त आयुक्त(१)प्रदीप जांभळे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमाकांत गायकवाड तसेच संबंधित कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली आज ४ क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे १,०१,७५० चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यात आली.
‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.११ कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १८ पत्राशेडसह एकुण अंदाजे ५३,२५० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई १ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १० स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व २७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने ६ जेसीबी (१ निडल) तसेच १२ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत १८ मीटर डि.पी रोड, कुदळवाडी आक्सा इलिगंस् सोसायटी समोर चिखली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकाम कारावाई केली. सदर कारवाई मध्ये २२ पत्राशेडची एकुण अंदाजे ४१,५०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करुन त्वरित मुरुम टाकण्यात आला. सदर कारवाई २ उप अभियंता, ५ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १५ चिखली पोलिस स्टेशन अधिकारी/ कर्मचारी व २० आर.सी.एफ यांच्या सहाय्याने ४ जेसीबी तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २३, २४ थेरगाव मध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे ४,८०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. सदर कारवाई २ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी व ९ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने ३ जेसीबी (१ निडल), तसेच ३० मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे २२०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई ३ उप अभियंता, ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १२ स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व १७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने २ जेसीबी, १ क्रेन, १ ट्रॅक्टर ब्रेकर तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.