पिंपरी चिंचवड,दि.०६:- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयचे पोलिस आयुक्तांनी दि. ०५/०५/२०२३ रोजी सायं १६:०० वा ते १७:३० वा चे दरम्यान ट्विटरवरून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयचे हद्दीतील नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलेला असून साडेतीनशे पेक्षा अधिक प्रश्न त्यांना नागरिकांनी ट्विटरवरून विचारले आहेत.२५० पेक्षा अधिक नागरिकांनी आयुक्तांना थेट प्रश्न विचारले तर अनेकांनी प्रश्न ट्विट केले. शहरात वाढणारी गुंडगिरी, कोयता गॅंग, वाहतूक समस्या आणि सायबर गुन्ह्यांबाबत अनेक प्रश्न ट्विटर धारकांनी विचारले.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यापासून पहिल्यांदाच ट्विटरद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने शहरात वाढणारी गुंडगिरी, वाहतूक कोंडी, कोयता गॅंग असे प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आले. चार महिन्यात ५९ शस्त्रे, २७६ कोयते जप्त करण्यात आले असून १३५ कुख्यात गुंडांवर मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरवरून आयुक्तांनी सांगितले. भविष्यात ही अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना ट्विटरवरून दिले आहे.
नागरिकांच्या विविध प्रश्नास आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावे अशी विनंती नागरिकांनी केली.