या झालेल्या चाळीस सामन्यांपैकी सहा सामने हे ड्रॉ झाले आहेत, तर उर्वरित सगळे सामने निकाली निघाले आहेत. विशेष म्हणजे 100 खेळाडूंनी हे 180 गोल केले आहेत. हॉकी चंडीगड आणि हॉकी पंजाबतर्फे प्रत्येकी नऊ जणांनी गोल केले आहेत, हॉकी हरियाणाच्या सात तर उत्तरप्रदेश हॉकीतर्फे सहा जणांनी सातत्याने गोल केले आहेत.
—
स्पर्धेचा अन्य लेखा जोखा
सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड, द मुंबई हॉकी असोसिएशन आणि पंजाब ऍण्ड सिंध बॅंक या संघांनी स्पर्धेत एकही विजय सकारला नाही. एसएससीबीने 20 गोल स्विकारले. मुंबईसाठी हा आकडा 17 वर राहिला. दुसरीकडे पंजाब ऍण्ड सिंध बॅंक संघाला एकही कार्ड मिळालेले नाही. त्यांनी स्पर्धेत सर्वात कमी अर्थात 3 गोल केले आहेत.
—
तीन हॅट्रीकचा धमाका
साखळी सामन्यांमध्ये झालेल्या लढतींमध्ये तीन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीकरत हॅट्रीकचा बार उडवुन दिला. त्यात नबीन कुंजर (स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड) ने 4 सलग गोल केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रच्या आमिद खानने हॉकी कर्नाटकाच्या विरोधात सलग तीन गाले ठोकले होते. याशिवाय हिमाचल हॉकीच्या वाशू देवने सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्डच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात ठोकले होते.
—
स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारे
7 ः एस. कार्थी (तामिळनाडूचा हॉकी संघ)
6 ः नबीन कूंजर (स्टील प्लांट स्पोर्ट बोर्ड)
5 ः गोपी सोनकर (उत्तरप्रदेश हॉकी)
—
फिल्ड गोल करणारे खेळाडू ः
4 ः एस कार्थी, गोपीकुमार सोनकर, मोहम्मद अलीशान (मध्यप्रदेश हॉकी अकादमी), वाशू देव (हॉकी हिमाचल), सुदर्शन सिंग (हॉकी पंजाब).
—
सर्वाधिक पेनल्टी कॉर्नर ः
5 ः नबीन कूंजर
—
उपउपांत्य फेरीचे सामने ः
1. हॉकी चंडीगड वि. मध्यप्रदेस हॉकी अकादमी. स. 9 वा.
2. हॉकी ओडिशा वि. हॉकी गंगपूर ओडिशा – स. 11 वा.
3. हॉकी हरियाणा वि. हॉकी पंजाब. दु. 1 वा.
4. उत्तरप्रदेश हॉकी वि. भारतीय खेळ प्राधिकरण (साई) दु. 2.30 वा.