पुणे,दि.25– केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत माहे जानेवारी, 2019 ते डिसेंबर, 2019 या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी 77 वी फेरी अंतर्गतविषय – ग्रामीण कुटूंबाकडे असलेली जमीन व पशुधारणा आणि शेतकरी कुटूंबांच्या परिस्थितीचे मूल्यांकन व कर्ज व गुंतवणूक इत्यादी बाबी विषयी माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
सर्वेक्षणाचे क्षेत्रकाम हे कार्यालयातील कार्यरत असणारे अन्वेषक करणार आहेत. सदर शासनाच्या सर्वेक्षणास नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक कार्यालय अर्थ व सांख्यिकी संचालनायाचे सह संचालक सुजाता अय्यर यांनी केले आहे.