नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर धूम ठोकून पळवून जाणारे पाकिस्तानच्या एफ -१६ विमानाला पाडण्यात आले आहे. भारतात घुसखोरी करून परतत असताना पाकिस्तानच्या हद्दीतील लाम व्हॅलीमध्ये हे विमान पाडण्यात आले आहे.
भारतीय हवाई हद्दीत पाकिस्तानच्या तीन विमानांनी हवाई हद्दीचं उल्लंघन करून भारतातील नौशेरामध्ये घुसखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी नौशेरामध्ये बॉम्ब फेक करण्याचा प्रयत्न केला. या विमानाने भारतीय हद्दीत तीन किलोमीटर आत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय विमानांनी त्याला प्रत्युत्तर देत पिटाळून लावले. धूम ठोकून पळत असताना तीनपैकी एक विमान पाडण्यात आले.
हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत तीन किलोमीटर आत गेल्यावर लाम व्हॅलीमध्ये विमान कोसळलं. विमान कोसळताना लोकांनी पाहिलं असून एक पॅराशुटही उघडल्याचे दिसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पायलची स्थिती अद्याप समजू शकली नाही.