दि,26 फेब्रुवारी जालना जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात *’एकदिवसीय तज्ञ व्याख्यानाचे’ आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानमालेसाठी आपले विचार मांडण्यासाठी मूळचे लातूर जिल्ह्यातील तपसे चिंचोली या गावचे सुपुत्र इंजि महादेव कोरे यांना आमंत्रित केले होते. ते सध्या श्री सिमेंट कंपनी लातूर* येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या स्थापत्य शाखेच्या प्रमुख वायाळ मॅडम ह्या होत्या.तसेच महाविद्यालयातील शिक्षक नितीन मुळे, कृष्णा वाघमारे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील द्वितीय आणि अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इंजि महादेव कोरे यांचा पुष्पहार ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कोरे यांनी आपल्या भाषणातून जीवनातील अनुभव ,व कठीण परिस्थितीवर कशी मात करून ध्येयप्राप्ती कशी करायची ? सोबतच श्री जंगरोधक सिमेंटचे वापरा बाबतीत,घराच्या बांधकामासाठी श्री सिमेंटचे महत्व किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन करून महाविद्यालयात आपला ठसा उमटवला.