ऑक्टोबर 2017 साली भारतात झालेल्या फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने तो खेळत होता.
ब्लॅकबर्न रोवर्स का चॅम्पियन्स लीग स्पर्धेत विजेता राहिलेल्या संघांपैकी एक आहे. यामध्ये मँचेस्टर युनायटेड, चेलसी, आर्सेनल, मँचेस्टर सिटी आणि लीचेस्टर सिटी या संघांचा समावेश आहे. या सर्वांचे दायित्व वेंकीज लंडन लिमिटेडकडे आहे. पुण्याची व्यंकटेश्वरा हॅचरीज ही कंपनी त्यांच्या सोबत कार्यरत आहे.
अनिकेत जाधव हा अश्या प्रकारचे प्रशिक्षण घेणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरणार आहे. तो इंग्लंडमध्ये स्थित ब्रोकहॉल, लंकेशअर ल
येथे ब्लॅकबर्न रोवर्स अकादमी येथे प्रशिक्षण घेणार आहे.
ब्लॅकबर्न रोवर्स फुटबॉल क्लबचे श्री. बालाजी राव यांनी सांगितले की, ‘आम्ही फुटबॉल समर्थक आहोत, भारतातील तरुण खेळाडूंच्या गुणवत्तेला आम्ही मदत करू पाहतो’.
‘युके मधील आमची ब्लॅकबर्न रोवर्स अकादमी ही कॅटीगिरी 1 मध्ये असलेली अव्वल अकादमी आहे. येथील प्रशिक्षण अनिकेतला नक्कीच तांत्रिक दृष्टीने मदतीचे ठरणार आहे, आणि सामन्यातून त्याचे योगदान वाढीस लागेल’
‘भारतातील फुटबॉलच्या गुणवत्तेला व्यासपीठ देऊन मोठे करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे. यातून भारताचे जागतिक स्तरावर फिफा रँकिंग वधारावे, असा आमचा प्रयत्न आहे.’
जमशेधपूर फुटबॉल क्लब कडून इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळणाऱ्या अनिकेत ने सांगितले की ‘मी ब्लॅकबर्न रोवर्स फुटबॉल क्लबचा आभारी आहे. त्यांनी माझ्या क्षमतांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला त्यांच्या जागतिक दर्जाच्या अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावले’.
‘बालाजी राव यांचेही या संधीसाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यासाठी मी केएसएमएन स्पोर्ट्सचे जेहन कोठारी, आणि माझ्या क्लबचे ही आभार मानतो.’
जमशेधपूर फुटबॉल क्लबचे मुकुल चैधारी म्हणाले ‘अनिकेतच्या निवडीचा आम्हाला आनंद आहे. अश्या प्रकारची दुर्मिळ संधी भारतीय फुटबॉलपटूना क्वचित मिळते, आणि ती ही या कमी वयाला. हे खरेच उत्तम असून, त्यांच्यातील फुटबॉलच्या गुणांना अधिक धार या माध्यमातून येणार आहे.
‘ही सर्वांसाठीच चांगली बाब आहे. जमशेधपूर फुटबॉल क्लबकडून आम्ही सगळे त्याचे अभिनंदन करतो. तू आजपेक्षा अधिक चांगला खेळाडू म्हणून या प्रशिक्षणातून बाहेर पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.’
केएसएमएन स्पोर्ट्सचे जेहान कोठारी म्हणाले की ‘आमच्या संस्थेचे हे ध्येय आहे की तरुण भारतीय फुटबॉलपटुच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळावे. त्यांचा विकास व्हावा आणि वेगळ्या प्रशिक्षणाच्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्या.