औसा दि, ८ :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील अंगणवाडी क्रमांक चार मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी कार्यकर्ती संपता नेटके, छाया कांबळे,अंगणवाडी सेविका कोमल नेटके, लक्ष्मी कलशेट्टी,आशा कार्यकर्ती सुवर्णा काळे,जनाबाई समदडे,सत्यशीला कांबळे , तसेच गावातील महिला भगिनी आणि किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रथमतः क्रांतिज्योती, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर अंगणवाडीच्या वतीने उपस्थित महिला आणि किशोरवयीन मुलींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या नेटके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला .यावेळी बोलताना नेटके म्हणाल्या की स्त्रिया या आज प्रत्येक ठिकाणी धडाडीने आणि तितक्याच हिमतीने कार्यरत आहेत.
स्त्रीयांसाठी शासनाने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून
द्याव्या ,त्यांच्या रक्षणासाठी वेळोवेळी तत्पर राहावे, तसेच स्त्रियांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहिले पाहिजे,तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचा,योजनांचा अंगणवाडी कार्यकर्ती सेविका यांच्या मदतीने लाभ घेतला पाहिजे तसेच येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी आणि बालकांच्या सुखसोयीसाठी अंगणवाडीला भेट द्यावे ,अडचणी कळवाव्यात असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार जनाबाई समदडे यांनी मानले.
कार्यक्रमाला गावातील सर्व महिला भगिनी, किशोरवयीन मुली तसेच अंगणवाडी मधील सर्व बालके उपस्थित होते.