पुणे दि,१९ : – चिठ्ठी लिहून घरातून निघून गेलेल्या तरुणीला फरासखाना पोलिसांनी ८ तासांच्या आत शोधून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर तिला व तिच्या आई वडीलांसोबत घरी रवाना केले.कसबा पेठेतील एका व्यक्तीने फरासखाना पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साततोटी पोलीस चौकीत आपली तक्रार घेऊन आले होते. त्यांची २० वर्षीय मुलगी दुपारी साडेतीन वाजता जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी चिठ्ठी लिहून ठेवून घरातून निघून गेली होती. त्यानंतर पाचच्या सुमारास त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलसांनी चौकशीला सुरुवात केली. दरम्यान ती घरातून निघून गेली तेव्हा सोबत मोबाईल घेतला होता.
त्यावरून पोलिसांनी तिचा माग काढत तिचे मोबाईल लोकेशन काढले. शेवटी रात्री ९ च्या सुमारास तिच्या आईसह सिंहगड परिसरात शोध घेतला. त्यावेळी ती बसस्टॉपवर बसलेली मिळून आली. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी तेव्हा ती नेटची परीक्षा देत होती. दरम्यान तीन वेळा परीक्षा देऊनही तिला यश आले नाही. त्यामुळे ती तणावात होती. तर यंदाही तिचा अभ्यास न झाल्याने ती तणावात आली होती. त्यामुळे ती आत्महत्या करण्यासाठी गेले होते. असे तिने सांगितले.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी यांनी तिचे समुपदेशन करत तिला आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यास सांगितले. तर आई वडीलांनाही समजावून सांगत त्यांचेही समुपदेशन केले. त्यानंतर आनंदाने ती मुलगी आई वडीलासंह घरी गेली.
यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे,पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे व कर्मचारी यांनी केले आहेत.