चिंचोली, दि २३ :- जि.प.प्रा.शा. तपसे चिंचोली या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप हरिपंत(धनंजय ) गोविंदराव कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले.गावचे सुपुत्र हरिपंत (धनंजय) गोविंदराव कुलकर्णी हे एकेकाळी
पुण्यात एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे आज ते दक्षिण आफ्रिकेत Reckitt Benckiser ( रेकीट बॅंकिंझेर) या कंपनीत मध्ये कंट्री मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.जन्मभूमी आणि कर्मभूमी माणूस कधीच विसरू शकत नाही. शेवटी जन्मभूमी आणि कर्मभूमी यांचे अतूट नातेसंबंध असतात ते अधिक दृढ करण्यासाठी तपसे चिंचोली गावचे सुपुत्र धनंजय गोविंदराव कुलकर्णी यांनी प्राथमिक शिक्षण ज्या जिल्हा परिषद शाळेत घेतले त्याच शाळेचे आपण ऋणी लागतो ,शाळेसाठी छोटीमोठी मदत करणे गरजेचे आहे आणि जितकी आपल्याकडुन शक्य होईल तितकी मदत केली पाहिजे या उद्दात हेतूने जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य परीक्षा पॅड, वही, पेन ,पेन्सिल आदी वाटप केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मोहनराव मोरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील,उपसरपंच सोमेश पाटील,गोविंदराव कुलकर्णी, हरिपंत(धनंजय) कुलकर्णी,
देवानंद पाटील, बालाजी कवठाळे, बिबिशन गरड,नितीन कवठाळे, लक्ष्मण कांबळे ,प्रशांत कुलकर्णी, नाना यादव, सुरेश सेलूकर,बालाजी शिंदे, अविनाश देशमुख,नामदेव दळवे हे होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद सेलूकर यांनी केले, तर जि.प सदस्य महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संतोषीमाता लोहार यांनी केले.
यावेळी मनोगतात बोलताना कुलकर्णी म्हणाले “जगात भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे ,विदेशात राहून सुद्धा गावाबद्दलचे प्रेम आणि ऋणानुबंध कमी होत नसतात उलट ते अधिक दृढ करणे आवश्यक असते असते.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळा ह्या कायमच विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असतात” असे सांगितले.