मुंबई : लिक्विड बायोप्सी म्हणजे काय ?
बियोप्सी मध्ये डॉक्टर सर्जरी करून काही सेल्स काढतात आणि तपासणी करून ते कॅन्सरस आहेत की नाही हे ठरवतात. लिक्विड बायोप्सी मधून पण सारखीच माहिती मिळते पण त्यासाठी सर्जरीची आवश्यकता नाही. ही टेस्ट नेहमीच्या ब्लड टेस्ट सारखी असते. म्हणून फुफ्फुस किंवा यकृताच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी बायोप्सीमध्ये टिशू घेतले जातात तर लिक्विड बायोप्सीमध्ये साध्या ब्लड टेस्टने त्याचे निदान होईल.
कॅन्सरचं सुरुवातीच्या टप्प्यात निदान आणि उपचार व्हावेत यासाठी मास हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. ही स्मार्ट केअर सिस्टीम आर्थिक, भाषिक अडथळ्यांशिवाय सर्वांना उपलब्ध असेल.भारतासारख्या देशात जिथं साधी रेडिएशन थेरेपी, इम्युनोथेरेपी, ड्रग्जदेखील अनेकांना परवडणारी नाही तिथं हे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. 99 टक्के उपचार आणि 1 टक्के प्रतिबंध याव्यतिरिक्त लोकांना स्क्रिनिंग आणि कॅन्सरचं लवकर निदान करण्यासाठी जागरूक करणं फायदेशीर आहे
जीवघेण्या कॅन्सरवर मात करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता इम्रान खान या दोघांनी कॅन्सरशी दिलेला लढा आपणा सर्वांना लढण्याची प्रेरणा देतो. या प्रकरणांमुळे कॅन्सरशी एकत्रित लढल्यानं आणि सकारात्मक विचार केल्यानं आपण कॅन्सरमधून बरं होऊ अशी आशा मिळते. कॅन्सर हा बरा होऊ शकत नाही, असा विचार करणाऱ्या लोकांसाठी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानापेक्षा विचारातील हा सकारात्मक बदल खूप महत्त्वपूर्ण आहे.
काही वर्षांपासून कॅन्सरवरील संशोधन उपचार आणि रुग्णाला जगवण्यावर केंद्रीत आहे. सातत्यानं झालेलं संशोधन आणि त्यातील विकास यानंतर आता वैद्यकीय तज्ज्ञ सध्या लिक्विड बायोप्सीबाबत बोलत आहेत. बायोप्सीमध्ये शरीराच्या कोणत्याही भागातील टिश्यू किंवा पेशी यांचे नमुने घेतले जातात आणि ते कॅन्सर तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. अशा वेळी लिक्विड म्हणजे तुमचं रक्त.
कॅन्सरचं योग्य निदान करण्यासाठी लिक्विड बायोप्सी केली जाते. ट्युमरचे टिश्यू घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. काही प्रकरणांमध्ये ट्युमरच्या जागेमुळे टिश्यू बायोप्सी करणं शक्य होत नाही. सर्जिकल प्रक्रियादेखील धोकादायक आणि खर्चिक असते. अशावेळी लिक्विड बायोप्सी चाचणी निदानासाठी योग्य ठरते. कमी प्रक्रिया, रेडिओअक्टिव्ह स्कॅन्सची गरज नाही आणि फक्त रक्तातून ट्युमर डीएनए ट्रेस होऊ शकतो.
बायोप्सीमुळे प्रत्येक कॅन्सरग्रस्त रुग्णावरील उपचार ठरवण्यात मदत होते. यामुळे रुग्ण थेरेपीला योग्य प्रतिसाद देतो आहे की, तो बरा होऊ शकतो का हे समजतं.
हार्वर्डच्या संशोधकांनी म्हटलं आहे की, जरी आज अशक्य वाटत असलं, तरी पुरेशी माहिती आणि संशोधनामुळे कॅन्सरची सुरुवातच नव्हे तर त्या रुग्णाच्या आनुवंशिक आणि मोलक्युलर प्रोफाईलवरून त्याला तो कोणत्या उपचारांना दाद देईल त्याच्यावर कोणते उपचार योग्य आहेत, हे सांगणारं AI विकसित करू. त्यावेळी कॅन्सर हा टर्निमल इलनेस (बरा न होणारा किंवा जीवघेणा आजार) नसेल तर या आजारासोबत आपण सर्वसामान्य आयुष्य जगू शकू.
मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत