मुंबई ७ :- सुजन फौंडेशन आणि क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच आझाद हिंद सेना अमृत महोत्सव आणि सातारा प्रतिसरकार अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने अहमदनगर येथे एका कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत एसटी ची सेवा पोहचली.ज्यांच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्राला एस टी समजली.लोकांच्या दळणवळणातील ये जा करणारी वाहतूक ही उदयास आली.ते धावलेल्या पहिल्या एसटीचे वाहक म्हणजे श्री. लक्ष्मण केवटे हे होत. अशा व्यक्तीचा सन्मान करण्याचा निश्यच हा सुजन फौंडेशन आणि क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समिती महाराष्ट्र राज्ययांच्यावतीने करण्यात आला होता.
त्यानुसार अहमदनगर येथील महात्मा फुले शाळा,माळीवाडायेथे हा कार्यक्रम संपन्न झाला.1 जून 1948 ला ही एसटी नगर ते पुणे या दरम्यान धावली होती.त्यामुळे एसटी च्या 71 व्या वर्धापन दिनी एका महत्त्वपूर्ण आणि योग्य व्यक्तीचा तसेच मोठ
मोठया शहर आणि खेडे गावातून धावत असलेल्या एसटी यांमुळे संपूर्ण एसटी महामंडळाचा
सन्मान केल्यागत आनंद यावेळीसर्वांच्या चेहऱ्या
वर दिसून आला.यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणुन स्वातंत्र्य सैनिक बाबुराव मुटकुळे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,
नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विजराव कोथिंबीरे
,संपतराव जाधव,बाबुराव मुटकुळे,यशवंत गारडे,
अजय डहाळे,सुरेश केवटे,संजय चौरे,दिलीप गोरे,आदि मान्यवर होते.तसेच यावेळी जिल्ह्यासह इतर भागातील अनेक मान्यवर हे मोठया संख्येने उपस्थित होते.
गेल्या ७० वर्षांत एसटी संपूर्ण महाराष्ट्राच्या काना
कोपऱ्यापर्यंत नागरिकांना सेवा देत आहे.कमी पैशातील ही सेवा नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा भाग बनली आहे. लक्ष्मणराव केवटे एसटीचे बदलत्या रुपाचे साक्षीदार आहेत.
त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा सन्मान करतांना मोठा आनंद होत आहे.”
नगरसेवक बाळासाहेब बोराटे-
एसटी ही महाराष्ट्राची जननी आहे.नफा तोटयाचा हिशोब न पाहता सेवा देण्याचे काम करीत आहे.
काळानुरूप बदल करीत आहेत.प्रारंभीच्या काळात
लक्ष्मण केवटे यांचे खुप मोठे योगदान आहे. त्यांचा सन्मान करणे आपले
कर्तव्यच आहे.”
-संपतराव जाधव-
-श्री. लक्ष्मण केवटे यांचा थोडक्यात परिचय-
श्री लक्ष्मण केवटे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२४ साली झाला.शिक्षण हे सातवी पर्यंत झाले आहे.
त्यांनी वाहक,कंट्रोलर व इन्स्पेक्टर आशा पदावर छत्तीस वर्षे सेवा केली.१ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावली.त्याचे वाहक लक्ष्मण केवटे हे होते. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती.१ जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते.शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती.पण राज्य परिवहन
ची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल. या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली. त्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते.पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने
नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले.
बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी