पुणे दि,१४: -वाहतुकीचे नियम व शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी आभार योजना सुरु केली आहे.पुणेकरांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाची शिस्त लागावी यासाठी वाहतुक पोलिसांकडून अनेक उपाययोजाना त्यानंतर कारवाई केली जाते. मात्र या बेशिस्तांसोबत शिस्त पाळणारेही आहेत. अशा वाहतुकीचे नियम पाळत शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी आभार योजना सुरु केली आहे. या योजनेअंततर्गत पुणे पोलिसांकडून वाहनचालकांना खरेदीवर डिस्काऊंट कुपन देण्यात येणार आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसोबतच वाहतुकीचे नियम पाळणारेही आहेत. हेल्मेट परिधान करणारे, वाहन परवाना जवळ बाळगणारे, तसेच कोणत्याही प्रकारचे वाहतुक नियम मोडल्याचे चलन नाहीत.
अशा वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून आभार योजना तयार करण्यात आली आहे.
अशी आहे पोलिसांची आभार योजना
जो वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतो त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्यावर एकही दंडाचे चलन नसेल अशा वाहनचालकांना वाहतुक शाखेचे अधिकारी एका कुपनचा एसएमएस देणार आहेत. त्या एसएमएसचा वापर तो वाहनचाक पुणे शहरातील काही हॉटेल्स, दुकाने, आस्थापना येथे वापरू शकतो. त्या कुपनच्या माध्यमातून त्याला १० टक्के सुट मिळणार आहे.