मुंबई दि,१७ :- मंत्रालयात शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात नुकतीच बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना राज्यस्तरीय समिती ची बैठक पार पडली या योजनेसाठी राज्यातून ३२६ पत्रकारांचे अर्ज माहिती अधिकारी कार्यालया मार्फत प्राप्त झालेले असून त्यांची छाननी सुरू आहे ,योजने करिता पात्र असलेल्या व निकषात बसणाऱ्या पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ निश्चित मिळणार आहे असे सन्मान योजना समितीचे सदस्य सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले.
या बैठकीला माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंग ,संचालक अजय आंबेकर , सुरेश वांदिले , अहंकारी ,शिवाजी मानकर , डा बोरूळकर , भोईर ,आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,
सर्वांशी या योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यात आली शासन या योजनेच्या अंमलबजावणी साठी सकारात्मक असून एक ही पात्र ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहणार नाही असे या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पत्रकारांचे झुंजार नेते एस एम देशमुख यांच्या नेतृत्वात मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या १६ संघटना सह पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून पत्रकारांना पेंशन योजना लागू करावी , पत्रकारासाठी संरक्षण कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यासाठी २१ वर्ष प्रदीर्घ लढा दिला , परिषदेसह सहकार्य करणाऱ्या १६ संघटनांच्या यासाठीच्या प्रदीर्घ लढ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिल्यामुळे यश मिळाले आहे असे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले
शासनाने पत्रकारांच्या प्रलंबित असलेल्या पत्रकाराना संरक्षण व पेंशन योजना ( सन्मान योजना ) लागू केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस एम देशमुख , किरण नाईक , अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , कार्याध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस अनिल महाजन ,कोषाध्यक्ष शरद पाबळे आदी सह राज्यातील परिषदेशी संलग्न ३५ जिल्हा पत्रकार संघांनी मुख्यमंत्र्याचे व शासनाचे अभिनंदन केले असून आता या दोन्ही योजनांची शासनाने तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी अशी आग्रहाची मागणी केली आहे
बाळू राऊत प्रतिनिधी