आष्टी। अविनाश कदम यंदा दहावी आणि बारावीच्या परिक्षेत तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले असून तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कतृत्वाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ओबीसी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ओबीसी बाराबलुतेदारांची राज्यस्तरीय बैठक व मेळावा देखील यावेळी संपन्न होणार आहे. सोहळा सोमवार दि.1 जुलै 2019 रोजी सुभाष रोड बीड येथील अमृत मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. यासाठी ओबीसी सामाजातील गुणवंतांनी तसेच ओबीसी समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी देखील गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत देवून नाव नोंदणी करावी असे आवाहन बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर यांनी केले आहे.
प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी ओबीसी समाजातील गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप पडावी व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने येथील ओबीसी समाजाच्यावतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वी परिक्षेत अनुक्रमके 80 टक्के व 70 टक्के गुण मिळविलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सोमवार दि.1 जुलै 2019 रोजी सुभाष रोड येथील अमृत मंगल कार्यालय बीड येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. ओबीसी समाजातील इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क्समेमोची एक झेरॉक्सप्रत प्रकाशराव कानगांवकर मो. 9850351816, सोनार समाजाचे ऍड. संदीप बेदरे मो. 9422043939, मंगेश लोळगे 9822450010, धनगर समाजाचे अंकुश निर्मळ मो. 9822504963, अमर ढोणे मो. 9922911588, परिट समाजाचे गणेश जगताप मो.9850507560, श्रीमंत गोतावळे मो, दत्ता नलावडे, मोहनराव राऊत मो.8975908367, सुधीर जाधव मो.9822512917, कुंभार समाजाचे अर्जुन दळे मो. 9881881292, माळी समाजाचे मो. किशोर राऊत मो. 9822421886, नाभिक समाजाचे युवराज शिंदे मो. 9423414548, गुलाबभाऊ चव्हाण मो. 9405798217, रमेश राऊत मो.9405829989, साळी समाजाचे राजु ताठे मो. 9850641050, गुरव समाजाचे गणेश पुजारी मो. 9850535545, संजय गुरव मो. 9822506791, मुस्लिम ओबीसी समाजाचे रफीक बागवान मो. 9423167440, तेली समाजाचे रामेश्वर पवार, शिवलिंग क्षीरसागर मो. 9860555244, वंजारी समाजाचे बाबासाहेब गित्ते मो. 8788943536, टकारी समाजाचे हिरालाल जाधव मो. 9860473336, सुतार समाजाचे बापुराव भालेकर मो.9822648126, भोई समाजाचे संजय घेणे मो. 9822863770, वाणी समाजाचे सचिन शहागडकर मो. 9921716021, कासार सामाजाजे बाळू रासने, रामेश्वर हुलजुते मो. 9028279223, जंगम समाजाचे उमेश स्वामी मो. 9373785223, गवळी समाजाचे दत्ता परळकर, भटक्या विमुक्त समाजाचे रमेश कैवाडे मो. 7779451101, कोष्टी समाजाचे सुरेश असलेकर मो. 9420422022 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच गुणवंतांच्या नावाची नोंदणी ही दि. 30 जुन 2019 पर्यंत करण्यात येणार आहे. तरी ओबीसी समाजातील जास्तीत जास्त गुणवंतांनी आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन बारा बलुतेदार महासंघा जिल्हाध्यक्ष तथा भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केले आहे.