आष्टी दि. २७ – आष्टी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.कन्या प्रशाला आष्टी जि.बीड येथे गुरुवार दिनांक 27 जून 2019 रोजी दुपारी 2 – 30 वाजता शालेय विद्यार्थीनींसाठी कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे व श्रीम.डाँ.हेलन केलर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासन मान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा कन्या प्रशालेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी स्वःखर्चाने शालेय साहित्याचे वाटप केले.
कन्या शाळेतील गरीब,होतकरु इ.5 वीत शिक्षण घेत असलेली दिव्यांग विद्यार्थीनीं सय्यद नसरिन सय्यद इद्रीस हिला शालेय साहित्याचे वाटप आष्टी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मा.के.के.माने,सहदिवाणी न्यायाधीश मा.व्ही.एन.शिंपी यांच्या शुभहस्ते व पोलीस निरीक्षक महादेव सुर्यवंशी,नायब तहसिलदार श्रीम.शारदा दळवी,अँड.सय्यद ताहेर जमाल,अँड.माणिकराव लगड,अँड.श्रीकृष्ण देशपांडे,अँड.सतिष गायकवाड,आष्टी वकील संघाचे अध्यक्ष अँड.नवनाथ विधाते,उपाध्यक्ष अँड.शार्दुल जोशी,सचिव अँड.गौतम निकाळजे,मुख्याध्यापक अरुण भापकर व कन्या प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते संविधानाचे पूजन करुन कायदे विषयक शिबीराची सुरुवात करण्यात आली.प्रथमतः शाळेच्या वतिने सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कायदे विषयक शिबीरात मुलींच्या स्वरक्षणार्थ बनविलेली योजना 2015 या विषयावर अँड.सतिष गायकवाड यांनी तर बालकामगार योजना 12 जून 2019 या विषयावर अँड.श्रीकृष्ण देशपांडे यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थीनींना सखोल मार्गदर्शन केले.
शेवटी आष्टी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टीचे न्यायाधीश मा.के.के.माने यांनी सविस्तर विद्यार्थ्यांच्या कायद्या विषयी मार्गदर्शन करुन मुलींनी नियमित अभ्यास करावा तसेच मोबाईलचा वापर टाळावा,काही वाईट गोष्टी तुमच्याशी होत असतील तर तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा वर्गशिक्षकांना स्पष्ट सांगाव्यात जेणेकरुन त्या विषयी तात्काळ दखल घेता येईल असेही शेवटी त्यांनी सांगितले.
कायदे विषयक शिबीराचे सुत्रसंचलन अँड.गौतम निकाळजे यांनी केले तर आभार राजेंद्र लाड यांनी मानले.सदरील शिबीरास मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थीनीं,शाळेतील सर्व शिक्षक,आष्टी न्यायालयाचे कर्मचारी बांधव उपस्थित होते.
बाळू राऊत प्रतिनिधी