पुणे दि, ०२ : – पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाजामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंबांसाठी वेळ देता येत नाही. कौटुंबिक कार्यक्रमातही कामाचा लोढ आसल्याने सहभागी होता येत नाही.
आणि 24X 7 कर्तव्यावर हजर असतो महत्वाच्या गुन्ह्यावर अन्वेषन प्रतिबंध कायदा व सूव्यवस्था प्रश्न सण-उत्सव व्हीआयपी बंदोबस्त अशा वेगवेगळ्या कारणामुळे पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर असतात कुटुंबातील काही
वेळेस महत्वाचे आनंदाचे क्षणा पासून हि दूर रहावे लागते अशा वेळेला कुटुंबातील वडीलधारी माणसं व पत्नी यांच्या पाठबळावर संसार संसाराचा रथ वाहून नेला जातो नेमका हाच धागा पकडून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलिसांच्या पदोन्नतीच्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबांना खास आमंत्रित केले.
या वेळी शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला ठेवून पोलिसांच्या खांद्यावर पदोन्नतीची फीत लावण्याचा मानही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात आला. त्यामुळे पोलिस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले!
दैनंदिन कामाचा ताण सहन करणाऱ्या पोलिसांना मुलांचे वाढदिवस, शैक्षणिक निकाल आणि छोटे-मोठ्या कार्यक्रमांना मुकावे लागते.
ही बाब डॉ. वेंकटेशम यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना मिळणाऱ्या पदोन्नतीच्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी झालेल्या कार्यक्रमात पोलिसांची कुटुंबातील नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेले कार्यक्रमाच्या वेळी पहिल्या मिळत होते.
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस आयुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ११६ पोलिस शिपाई ते पोलिस हवालदार यांना पोलिस नाईक ते पोलिस जमादार (सहायक पोलिस उपनिरीक्षक) अशी पदोन्नती देण्यात आली. पोलिस आयुक्तांच्या समवेत पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार व फीत लावण्याचा मान त्यांचे आई-वडील, पत्नी, मुले व बहिणींना मिळाला. नेहमी शासकीय पद्धतीने होणारा हा कार्यक्रम कुटुंबांच्या उपस्थितीत झाल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला.