बोरघर दि,०६ :- बोरघर/ माणगांव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षा ( पीएसएस) इयत्ता ८ वी फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला आहे. सदर परीक्षेत गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धन शाळेतील विद्यार्थी कुमार चिन्मय ललित मेथा ग्रामीण विभागातून शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. चिन्मयचा श्रीवर्धन मधून पहिला तर जिल्ह्यातून २९/ १७३ व्या क्रमांकाने शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे. या पूर्वी चिन्मयला इयत्ता चौथी मध्ये असताना त्याने शिष्यवृत्ती मिळवली होती. चिन्मय हा वर्गातील सर्वात हुशार आणि गुणी मुलगा आहे. चिन्मयच्या अंगी अभ्यासू वृत्ती, वक्तशीरपणा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे गुण आहेत. चिन्मय ला ह्या यश शिखरावर पोहचवण्यात त्याची आई सौ. डॉ. फाल्गुनी मेथा आणि वडील श्री. ललीत मेथा आणि त्याचे सर्व शिक्षक यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १७३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कुमार चिन्मय मेथा याचा २९ वा क्रमांक आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत चिन्मयने मिळवलेल्या यशा बद्दल त्याचे त्याचे आई वडील, शिक्षक, नातेवाईक आणि समाजाच्या सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करुन कौतुक केले जात आहे.
( विश्वास गायकवाड )