पुणे, दि, १० ; – ऑनलाइन व्यवहाराद्वारे फसवणूक झालेल्या आठ नागरीकांना सव्वातीन लाखाची रक्कम परत मिळवून देणाऱ्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार हरित मित्र परिवराचे संघटक डॉ, महेंद्र घागरे यांनी केला, यावेळी औषधी वनस्पतींचे वाटप ही करण्यात आले,पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करणाऱ्या पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, विजयकुमार शिंदे, राजेंद्र मुळीक, सहाययक पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे, सागर पानमंद, पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार, रवींद्र गवारी, कपिल भालेराव, किरण औटे यांचा सत्कार घागरे यांच्या हस्ते करण्यात आला, मुख्य कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले,फोटो ओळी :हरित मित्र परिवारातर्फे सायबर पोलिस सेल मधील अधिकाऱ्यांचा सत्कार डॉ, महेंद्र घागरे यांच्या हस्ते करण्यात आला,