अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता या सदस्य नोंदणी प्रसंगी पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.भानुदास बेरड, खासदार श्री.सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष प्रदेश भाजपा श्री. बाळासाहेब गावडे, आमदार श्री. शिवाजीराव कर्डीले, आमदार सौ.मोनिकाताई राजळे, आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, माजी आमदार श्री. बबनराव पाचपुते, महापौर श्री. बाबासाहेब वाकळे तसेच जिल्ह्यातील भाजप पक्षाचे नगरसेवक, जि.प. सदस्य, शक्ति केंद्र प्रमुख, अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी -कमलेश नवले, नेवासा)