पुणे दि १८ : – पुणे स्वारगेट बसस्टॉपजवळ मोटारसायकलवर थांबलेल्या दोघा तरुणांना पाहून रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा दामिनींनी मार्शल यांना त्या मोटारसायकलवर थांबलेल्या दोघा तरुणांनाचा संशय आला. त्यांनी त्या तरुणांना विचारपूस करत असताना त्यांच्यातील एक जण पळून गेला व एकाला पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडील गाडी हि चोरीची असल्याचे आढळून आले आहे. जयश्री भालेराव आणि रणशिंग या दामिनी मार्शलनी ही कामगिरी केली आहे.रात्री रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यावर अनेक गैरप्रकार होत असतात. एकट्या
तरुणी, महिलांना त्रास देण्याच्या प्रकाराला आळा घातला जावा, यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी दामिनी पथकाकडून पायी पेट्रोलिंग केले जाते.त्यानुसार भालेराव व एस बी रणशिंग या बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील कात्रजकडे जाणाऱ्या बसस्टॉपजवळ पेट्रोलिंग करीत आल्या. बसस्टॉपवर काही महिला बसची वाट पहात होत्या. त्यांच्या जवळच दोघे जण एका मोटारसायकलवर बसलेले दिसले.महिलांच्या जवळ थांबलेल्या या दोघांविषयी त्यांना संशय आल्याने त्यांनी त्या दोघांना हटकले. त्यांच्या मोटारसायकलवर नंबर प्लेटही दिसली नाही. त्यामुळे त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल. तेव्हा त्यांच्यातील एक जण पळून गेला. एकाला त्यांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे नव्हती. लायसन्सही नव्हते. त्यामुळे वाहतूक पोलिसाच्या मदतीने त्यांनी गाडीची माहिती मशीनवर तपासली. त्यावर आलेल्या नंबरवरुन पोलिसांनी गाडीच्या मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्याने आपली मोटारसायकल आपल्या जवळ असल्याचे सांगितले.त्यांनी सांगितलेल्या माहितीवरुन ही मोटारसायकल चोरीची असल्याचे आढळून आल्याने या दोन्ही दामिनी मार्शलने मोटारसायकल व अल्पवयीन मुलाला पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रात्री पेट्रोलिंग करुन वाहन चोरट्याला पकडलेल्या या दामिनी पथकाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.