पुणे, दि,१९ : -सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील डॉ, दुधभाते नेत्रालाय व रेटिना सेंटरतर्फे नवव्या वर्धापनदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,डॉ, अनिल दुधभाते यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १३0 रुग्णांची मोतीबिंदू, काचबिंदू व रेटिनाची तपासणी केली, यावेळी १३ रुग्णांना मोतीबिंदू तर ९ मधुमेही रुग्णामध्ये रेटिनाचा दोष आढळून आला. या सर्व रुग्णावर लवकरच ना नफा ना तोटा या तत्वावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नेत्रालायचे संचालक डॉ, दुधभाते यांनी सांगितले,यावेळी डॉ, दुधभाते यांनी रुग्णाशी संवाद साधून त्याना डोळ्याचे आजार व त्याची काळजी कशी घावी या विषयी मार्गदर्शन केले,हे शिबीर यशवी होण्यासाठी प्रियांका एडके, अश्विनी कदम, विनया कुलकर्णी, संदीप मोरे, दादा गुरव, विजया कुलकर्णी आणि भावना जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले,