मुंबई दि,२३ : – अनेक असे कर्मचारी आहेत ज्यांना आपल्या प्रॉव्हिडन्ट फंड मध्ये झालेल्या बदलांबद्दल माहिती नसते. सोबतच आपल्या पगारातून Provident Fund (PF) कापला जातो हे त्यांना माहित असता पण त्यासंबंधित नियमांशी ते अपडेटेड नसतात. PF amount बद्दल काही दिवसांपूर्वी कर्मचारी भविष्य निधी संगठन म्हणजे EPFO ने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत आणि या नवीन नियमानंतर आता PF मधून तुम्ही तुमचे पैसे ऑफलाईन काढू शकणार नाही.
नियमानंतर तुम्ही मॅनुअली म्हणजे ऑफलाइन मोडने पीएफ (PF amount) काढू शकणार नाही पण त्यासाठी काही अटी आणि नियम पण लागू आहेत. जर तुमचा आधार नंबर EPFO च्या यूनीवर्सल अकाउंट नंबर (UAN) शी लिंक असेल तर तुम्ही प्रॉव्हिडन्ट फंड (PF) काढण्यासाठी ऑफलाइन क्लेम करू शकणार नाही. EPFO ने अश्याबाबतीत ऑफलाइन क्लेम स्वीकारण्यास नकार दिला आहे.याचा अर्थ असा कि जर तुमचा आधार UAN शी लिंक असेल तर तुम्हाला पीएफ काढण्यासाठी online क्लेम करावा लागेल.
Zee Business च्या रिपोर्ट्सनुसार Regional Commissioner NK Singh ने आपल्या एका विधानात सांगितले आहे कि ईपीएफओ ने फील्ड ऑफिस मध्ये ऑफलाइन क्लेम वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यांनी असे पण सांगितले आहे कि EPFO द्वारे यासंबंधित एक सर्कुलर जारी करण्यात आले आहे.
अनेक कंपन्या मोठ्या संख्येने अश्या मेंबर्सचा क्लेम फिजकल फॉर्म द्वारे करत होत्या ज्यांचा ADHAAR, UAN शी लिंक आहे. ज्यामुळे क्लेम सेटेलमेंट मध्ये वेळ जात होता. याचकारणामुळे कंपन्यांचे ऑफलाइन क्लेम स्वीकारले जाणार नाहीत आणि कंपन्यांना सांगण्यात आले आहे कि त्यांनी ऑनलाइन क्लेम सर्विस प्लॅटफॉर्मचा वापर करावा.
महत्वाच्या गोष्टी…
विशेष म्हणजे पीएफ काढण्यासाठी कंपनी मध्ये EPF withdrawal Form जमा करण्याची गरज नाही. ऑनलाइन क्लेम नंतर फील्ड ऑफिसर द्वारा क्लेम वेरिफाई केला जाईल. त्यासाठी तुमच्या यूनीफाइड पोर्टल वर KYC अपडेट असावा.
ऑनलाइन क्लेम करण्यासाठी
EPFO च्या वेबसाइट http://www.epfindia.com/site_en/ वर जा
ऑनलाइन क्लेम ऑप्शन वर जा
ऑनलाइन क्लेम ऑप्शन वर क्लिक करा आणि https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंक उघडा
लिंक उघडून आपला यूनीवर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आणि पासवर्ड टाका
आता claim settlement option मिळेल
तुम्हाला withdrawal Form कंपनी मध्ये जमा नाही करायचा
ऑनलाइन क्लेम नंतर फील्ड ऑफिसर द्वारा क्लेम आपोआप वेरिफाई केला जाईल.
बाळु राऊत मुंबई प्रतिनिधी