नेवासा दि,०९ :- दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याला कर्ज मुक्त करावे तसेच अरबी समुद्रात शिवस्मरकाच्या नियोजित कामाला लवकरच सुरूवात करण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे तालुका अध्यक्ष व मराठा टायगर छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी अध्यापही काही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले असून शासनाने कोणतीच अट न ठेवता शेतकर्यांची सरसगट कर्जमाफी करावी व अरबी समुद्रात शिवस्मरक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करावा, अन्यथा दांडकी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर नेवासा तालुका अध्यक्ष कमलेश नवले,नेवासा तालुका संघटक पप्पू बोधक,अक्षय बोधक,अभिजीत बोधक, अभिजीत साळवे,नितीन आरगडे,विशाल तुपे,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.