पिंपरी, ०९ : – क्षेत्र कुठलेही असो आपणास ज्या गोष्टींची मनापासून आवड आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण मनापासून मेहनत घेऊन काम केल्यास त्या क्षेत्रात आपण खात्रीपूर्वक् धेय्य गाठू शकतो असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच समाज सेवेमध्ये कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, विधीसमिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसदस्या माई ढोरे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य अनंत को-हाळे, नामनिर्देशित प्रभाग समिती सदस्य दिनेश यादव, सहाय्य्क आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले व सन्मानार्थी आदी उपस्थित होते,
यावेळी महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता सौरभ भावे, माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव, पर्यावरण प्रेमी महेंद्र शेवाळे, राहूल मोकाशी, संदीप भगत, वैभव रहाटे, किकबॉक्सींगचे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खुशी रेवाळे, वैदही पवार, तनुजा बिचकुले, प्रविण वाघ, आदित्य कोईनकर, संजय मरगुडे, रोलबॉल स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू पार्थ वडेलकर, आंतरराष्ट्रीय योगसन सुवर्णपदक विजेत्या सलोनी जाधव, सोनाली दामले, गोसेवक रामकृष्ण लांडगे व किकबॉक्सींगचे प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.