बिलोली दि १६:- ,श्रावण मासाचे औचित्य साधून बिलोली शहरातील बडूर मार्गावर असलेल्या इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे दि.३ आँगस्ट ते दि.२४ आँगस्ट पर्यंता संत सोमशंकर नागनाथ स्वामी चिंचोलिकर यांच्या ११ व्या श्रावणमास तपोनुष्ठान व परमरहस्य पारायण,दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सलग २३ दिवस चालणाऱ्या तपोनुष्ठान,परमरहस्य सोहळ्यास शहर व परिसरातील भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
आणि काही ऐसे करावे.सुखाचे मळे पिकवावे! अमुलाग्र नासून जावे,विघ्न बाधा !! या मन्मथ माऊलीच्या उक्तीप्रमाणे भौतिक युगात माणसाल सुखाची प्राप्ती व दुखाचे निस्सारण व्हावे यासाठी नामसंकिर्तन ,भजन,प्रवचन,सत्संग यांची आवश्यकता आहे.म्हणूनच श्रावण मासाचे औचित्य साधून वसूंधरारत्न डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या आशीर्वादाने २००९ साली संत या पदवीने सन्मानीत झालेले संत सोमशंकर नागनाथ स्वामी चिंचोलीकर यांनी सामाजिक ठेवा जपत इच्छापुर्ती हनुमान हनुमान मंदिर बिलोली येथे दि.३ आँगस्ट पाहून ११ व्या श्रावणमास तपोनुष्ठानास प्रारंभ केला आहे.२३ दिवस चालणाऱ्या या तपोनुष्ठान सोहळ्यात पहाटे ५ ते ६ वा शिवपाठ,६ ते ७ वा रूद्राभिषेक,सकाळी ८ ते ११ परमरहस्य ग्रंथाचे पारायण,११ ते १२ प्रवचन,दु.१२ ते ३ प्रसाद,३ ते ५ मन्मथ गाथा,५ ते ६ प्रवचन,६ ते ७ शिवपाठ, व राञी ८ ते पहाटे ५ वाजजे पर्यंत शिवजागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.तर दि.१७ आँगस्ट रोजी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या लिलाम्रत ग्रंथाचे पारायण व नानिजधाम येथील प्रवचनकार सौ.सुनैना गजानन सुलाखे यांचे अमृततुल्य प्रवचन,दि.२३ रोजी सायंकाळी ५ वाजता २१हजार दिप उत्सव व शि.भ.प शिवानंद महाराज दाभशेटकर यांचे राञी ८ ते ११ यावेळेत किर्तन,दि.२४ आँगस्ट रोजी सत्संग सेवा केंद्र सालूर यांचा पालखी सोहळा व पुज्य श्री.वे.शा.स पंडीत प्रणव महाराज जोशी पुणे यांचे राञी ठिक ८ वाजता भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्या दरम्यान दररोज प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.तरी जनकल्यानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपीनुष्ठान,परमरहस्य पारायण व दिप उत्सव सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन आयोजन समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.