मुंबई दि,१५ : – बीड जिल्ह्यातील मुलींची एकमेव असणारी जिल्हा परिषद बीडची आदर्श शाळा कन्या प्रशाला आष्टी,ता.आष्टी,जि.बीड या शाळेत मुलींनी ” बच्चों की फुलवारी ” या उपक्रमांतर्गत हिंदी मधून कवीतांचे लेखन केलेले होते.त्यांनी लेखन केलेल्या हिंदी कवीतांचे दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी ” हिंदी दिनाचे ” औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम.डाँ.रिजवाना शेख यांच्या शुभहस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ मार्गदर्शक लक्ष्मण रेडेकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद तळेकर,शिक्षण प्रेमी डाँ.नदीम शेख,आष्टी नं.1 शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार,माध्यमिक शिक्षक संघटनेचे आष्टी तालुकाध्यक्ष रविंद्र भोसले,प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण भापकर,जेष्ठ शिक्षक राम भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
” बच्चों की फुलवारी ” या उपक्रमांतर्गत प्रशालेतील 32 विद्यार्थीनींनी हिंदी मधून कवीता तयार केलेल्या होत्या.त्या सर्व विद्यार्थीनींचा प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.तसेच यामध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थीनीं प्रतिक्षा तवले,अमृता जोशी,आयेशा पठाण यांचा विशेष पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी प्रशालेतील हिंदी विषय शिकविणारे आदर्श शिक्षक सुरेश नरोड,विठ्ठल जगताप,श्रीम.आशा शिंदे,श्रीम.संजिदा मिर्झा यांचाही यथोचित सन्मान करण्यात येवून प्रशालेच्या वतिने माध्यमिक शिक्षक संघटनेचे नुतन तालुकाध्यक्ष रविंद्र भोसले,उपाध्यक्ष सतिश दळवी,महिला प्रतिनिधी श्रीम.स्वाती टेकाडे यांचा प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हिंदी विषयासंदर्भात श्रीम.डाँ.रिजवाना शेख,लक्ष्मण रेडेकर,शरद तळेकर,डाँ.नदीम शेख यांनी विद्यार्थीनींना हिंदी भाषेतून बहुमोल मार्गदर्शन करुन हिंदी भाषेचा व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा असे सांगून हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीम.आशा शिंदे,श्रीम.संजिदा मिर्झा,श्रीम.लतिका तरटे,श्रीम.भाग्यश्री भापकर यांनी हिंदी भाषेमध्ये आदर्श परिपाठ सादर करुन सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमाचे आयोजन तथा सुत्रसंचलन प्रशालेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,कवी राजेंद्र लाड यांनी करुन आभार सुरेश नरोड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व आदर्श शिक्षकांनी व गुणी विद्यार्थीनींनी कठोर परिश्रम घेतले.