मुंबई,दि.२५ :- मुंबई शूटिंगबाॅल असोसिएशनची वाषीॅक सर्वसाधारण सभा शनिवार दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडली. या सभेत सन २०१९-२०२२ च्या त्रैवर्षासाठी नवीन कार्यकारिणी समितीची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी-माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीसपदी-दीपक सावंत, उपाध्यक्षपदी-भास्कर कावले, मंगेश भोसले, प्रदीप वाघ, राजा राजापुकर तर कार्याध्यक्षपदी-विजय रावराणे, सरचिटणीसपदी-जालंदर चकोर, मिलिंद बिजेॅ, खजिनदारपदी-प्रफुल्लकांत वाईरकर, सहखजिनदारपदी-राजा कुडतरकर तर सदस्य म्हणून रत्नदीप रावराणे, ध्रुवकुमार वाईरकर, विद्याधर जामसंडेकर, पांडुरंग सुतार, श्रीकांत वाईरकर, बलविंदर फ्लोरा, राजेश चव्हाण, सहदेव कावले, दिलीप मालंडकर व पंडित मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली.
मुंबई शूटिंगबाॅल असोसिएशन ही संस्था शूटिंगबाॅल फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेला संलग्न असून शूटिंगबाॅल या क्रीडाप्रकारात मुंबईला राज्याचा दर्जा मिळालेला आहे. यावर्षी मुंबईत राष्ट्रीय स्तर, अखिल भारतीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस सरचिटणीस व नूतन कार्यकारणी समितीने व्यक्त केला. शूटिंगबाॅल हा राज्यमान्य क्रीडाप्रकार असून शालेय क्रीडागुण, छत्रपती पुरस्कार यात समाविष्ट आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी