निरा नरसिंहपुर दि. ५ निरा नरसिंहपुर परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे या परिसरात पाणीच पाणी साचल्याने मका बाजरी कांदा लसुन कोथंबीर पालेभाज्या आंबा कारले ज्वारी हरभरा या पिकांचे अतोनात नुस्कान झाल्यामुळे शेतकरी राजा दुखावलेला आहे पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच हरिभाऊ बाबुराव सुतार व सिताराम भीमराव बोडके यांच्या शेतामध्ये केलेले मक्याचे पीक पाणी साचल्यामुळे झालेले नुसकान व दुर्दशाअनेक शेतकऱ्यांच्या उसामध्ये पाणी साचून ऊसाची व केळी पिकाची अतिशय साचलेल्या जास्त पाण्यामुळे पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे स्वतःच्या पोटासाठी पिकवलेले पिकही शेतकऱ्याला पावसामुळे घेता येईना ही आवस्था शेतकऱ्याची झाल्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत शेतकऱ्याला द्यावी तरच शेतकरी राजा जिवंत राहील नरसिंह पूर टनु गिरवी ओझरे पिंपरी बुद्रुक गणेश वाडी गोंदी लुमेवाडी सराटी शिंदे वस्ती या सर्वच भागातील शेतकरी राजा चिंतेत असल्यामुळे पाऊस केव्हा येईल सांगता येत नाही कांद्याचे नुस्कान सुर्यफुलाचे केळी अशा अनेक प्रकारच्या पिकांचे पावसाच्या पाण्यामुळे दैनंदिन अवस्था झालेली आहे सरसकट सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये मदत तातडीने द्यावी अशी या परिसरातील शेतकरी राजा करीत आहे
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार तालुका इंदापुर जिल्हा पुणे