मावळ दि,०६ :-विवाहितेने राहत्या घरात दिड वर्षोने मुलासह स्वतला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास मळवंडी ढोरे ता मावळ येथे उघडकीस आला.स्नेहा सोमनाथ ढोरे (वय २६ रा मळवंडी ढोरे ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहतेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पती सोमनाथ रामभाऊ ढोरे (वय २९रा.मळवंडी ढोरे ता मावळ) सासू लक्ष्मीबाई रामराव ढोरे नंद पिंकी चांदेकर (रा.आढले बुद्रुक) व सुनीता सावंत (रा गोडुंब्रे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत स्नेहा चे वडील संतोष सोपान कुंजीर (वय ४९ रा.गहुंजे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे याप्रकरणी या फिर्यादीनुसार स्नेहा सोमनाथ तिच्याशी सुमारे तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता तिला दीड वर्षाचा मुलगाही होता ती पाच महिन्यांची गर्भवती होती दोन वर्षापासून तिचा मानसिक छळ चालू होता व पती तिच्याशी व्यवस्थित वागत नव्हता व सासू नंणदाही त्यात भर घालत होत्या या चौघांच्या छाळाला कंटाळून स्नेहाने दीड वर्षांच्या स्पर्श मुलासह राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली.व पुढील तपास पो.नि.निंबाळकर हे करीत आहे
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी