निरा नरसिंहपुर दि ११ डेंगूसदृश्य आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत तालुका इंदापूर सतर्क झाली आहे एक मशिनद्वारे फवारणी करण्यात येत असल्याची माहिती सरपंच आबासाहेब बोडके पाटील उपसरपंच जाहीराबी व ग्रामसेवक बळीराम शिंदे यांनी सांगितले नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली प्राथमिक जबाबदारी असून पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात मशीनद्वारे फवारणी सुरू केली आहे याबाबत सरपंच आबासाहेब बोडके पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांना डेंग्यूच्या सदृष्य आजाराची प्रादुर्भाव झाल्याची चर्चा ऐकायला मिळाल्यानंतर लगेच ग्रामसेवक बळीराम शिंदे व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या शंकर रंधवे बापूराव सूर्यवंशी दादासाहेब शेख यांनी सूचनेचे पालन करून फॉगिंग मशीन द्वारे संपूर्ण गावामध्ये फवारणी चालू आहे सर्व गावांमध्ये परिसरात घरांच्या आजूबाजूला व गटारं वरील ही फवारणी करीत आहेडेंगू बाबत जनजागृतीही करण्यात येत असल्याचेही सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनी सांगितले
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर पुणे