पिंपरी दि१२ : -गेले 14 वर्षापासून गोरगरिबांची अविरत सेवा करणारे भोसरी येथील सुप्रसिध्द मल्टीस्पेशेलिटी अत्याधुनिक, अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळबडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ह्दयरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पुर्ण एक महिना चालणार आहे, अशी माहिती ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ. सुनिल अगरवाल यांनी दिली.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की, एका सर्वेनुसार भारतात दरवर्षी अंदाजे 7 लाख 50 हजार व्यक्तींचा मृत्यू हद्यरोगाने होतो. त्यामुळे योग्य वेळी हृदयरोगाचे निदान होणे आवश्यक आहे. स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून हे शिबिर 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2019 दरम्यान रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा चौक, आळंदी रोड भोसरी येथे आोजित केले आहे. या शिबिरात ह्दयरोग तपासणी अंर्तगत इ.सी.जी., स्ट्रेस टेस्ट, 2 डी इको फक्त 999 रुपयात करण्यात येणार आहे. तसेच अॅन्जिओग्राफी 5000 रुपये, अॅन्जिओप्लास्टी 60000 रुपये आणि बायपास शस्त्रक्रिया 150000 रुपयात करण्यात येणार आहे. जर रूग्णांकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल तर हे सर्व तपासणी आणि उपचार, शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. सुनिल अगरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी किंवा रजिस्टे्रशन साठी 91303219766/ 8888825603/7774049691 वर संपर्क करु शकता.
डॉ. सुनिल अगरवाल एमबीबीएस, एमडी, डीएनबी इंटरनॅशनल कारडीयालॉजिस्ट आहेत. त्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीयोलॉजि कडून फेलोशिप देण्यात आले आहे. भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरा सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ.अशोक अग्रवाल यांनी केले.
ओम हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सुनिल अग्रवाल हे महाराष्ट्रातील नामांकित कार्डिओलॅजिस्ट असून आतापर्यंत त्यांनी दहा हजारांच्यावर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. तसेच ते अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॅजीचे फेलो असल्याने जगभरात होणार्या प्रगत उपचार व तंत्रज्ञान त्यांना त्वरीत उपलब्ध होते आणि त्याचा फायदा रुग्णांना होतो. येथे माफक दरात योग्य तो उपचार दिला जातो. ओम हॉस्पिटलमध्ये एक नाही दोन नाही, तब्बल 150 प्रकारच्या विविध आजारांवर औषधोपचार केले जातात. निरनिराळ्या आजारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी सर्व प्रकारचे तज्ञ व अनुभवी डॉकटर्स, सक्षम निदान सेवा, गुणवंत स्टाफ, अत्याधुनिक उपकरने असल्याने एकाच छताखाली सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. येथे 24 तास तातडीची व तत्पर सेवा, कॅथ लॅब, इंटरव्हेनशनल कार्डीओलाॅजी शस्त्रक्रिया, दुर्बीणी द्वारे सर्व शस्त्रक्रिया, गुद्द्वाराच्या शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक अस्थिरोग शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागाची सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी व नामांकित डॉक्टर उपलब्ध आहे. यामध्ये स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, अॅक्सिडेंट व ट्रामासेंटर, ह्दयरोग विभाग, मल्टीस्पेशालिटी ओपीडी, सुसज्ज फिजीओथेरापी विभाग व डायग्नॉस्टिक विभाग वेगवेगळे आहेत.