पुणे, दि.२४ :- पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणार्या इसमाला दि २३ रोजी वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचोरी गुन्ह्याना प्रतिबंध व्हावा म्हणून सहाय्यक फौजदार प्रदिप गुरव पेट्रोलिंग करत हॉटेल स्टेप इन केदारी नगर वानवडी येथे आले असता यांना गोपनीय माहिती मिळाली कि एक इसम हॉटेल स्टेप इन केदारी नगर वानवडी येथे येथे गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली. त्या ठिकाणाची माहिती गुरव यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना कळवली असता त्यांनी खात्री करून कारवाईचे आदेश दिले. व गुरव यांनी दोन टीम तयार करून दोन पंचाना बोलावून त्यांना आशय समजावून सांगून त्यांनी सहमती दर्शवल्याने दोन्ही टीम सापळा रचून. त्याना हॉटेल स्टेप इन केदारी नगर वानवडी येथे २:३० सुुमारास बातमीदाराच्या वर्णनाचा इसम उभा दिसला. गुरव यांनी दोन्ही टिमना इशारा केल्यावर दोन्ही टिमनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याला नाव, पत्ता विचारल्यावर त्याने छोटू उर्फ रॉबर्ट स्वामी वय २२ राहणार संत गाडगे महाराज शाळेजवळ कोंढवा खुर्द पुणे आसे सांगितला. त्याच्याकडून ५० हजार रूपयाचे देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीनमध्ये ८००/- रूपयाचे पितळी काडतूस असा एकूण ५०,८००/- रूपयाचा माल जप्त केला आहे. त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने वानवडी पोलिस स्टेशन येथेगुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई पूर्व प्रादेशिक विभागचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, परीमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, वानवडी विभागचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, गुन्हेचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदीप गुरव, हवालदार दत्तात्रय तेलंगे, पोलिस नाईक माऊली गिरमकर,सुदर्शन बोरावके, दुधाळ, गायकवाड, शिपाई शिरीष गोसावी, युवराज दुधाळ, यांच्या पथकाने केली आहे.