पुणे दि२४ : -कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल गुन्ह्यातील जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि कर्मचारीयांच्यावतीने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने (एसीबी) खासगी व्यक्तीला रंगेहात पडकले. दरम्यान उपनिरीक्षक आणि कर्मचारी पसार झाले आहेत.राजू उस्मान अक्तार वय ४८ रा कोंढवा असे पकडलेल्यांची नावे आहेत. तर उपनिरिक्षक भीमराव भिकाजी मांजरे वय ३२ आणि पोलीस शिपाई गोपाल हरी दाभाडे वय २५ यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.मांजरे हे कोंढवा पोलीस ठाण्यात पुणे पोलीस दलात नेमणुकीस आहेत. ते प्रोबेशनरी म्हणून कोंढवा पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. तर दाभाडे हा येथे कर्तव्यास होते. तसेच राजू हा येथील मसाला व्यापारी आहे.यातील तक्रारदार यांच्या नातेवाईकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात न्यायालयात जमीन मिळविण्यासाठी मदत करतो म्हणून उपनिरीक्षक मांजरे, कर्मचारी दाभाडे यांच्या वतीने खासगी व्यक्ती राजू यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रविवारी रात्री
तक्रारदार यांच्या कडून तडजोडी अंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजू यांना पकडण्यातआले. मात्र मांजरे व दाभाडे हे कारवाई दरम्यान तेथून पसार झाले. एसीबीकडून त्यांचा शोध घेण्यात आला.परंतु ते मिळून आले नाहीत. या तिघांवर कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केलेल्या याबाबत लाचलुचपत विभाग पुणे कार्यालय खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे दूरध्वनीक्रमांक०२०-२६१२२१३४ व्हाट्सअप क्रमांक :- ७८७५३३३३३३