अक्कलकोट.दुधनी दि.२८ :- चालू शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद शाळांचे क्रिडास्पर्धा घेण्यात येत आहे. यात दुधनी केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला येथे संपन्न झाला. अत्यंत चुरसीने झालेल्या या स्पर्धेत भिमनगर कन्नड शाळेने परंपरे प्रमाणे आपले वर्चस्व गाजवून घवघवीत यश मिळवले.या स्पर्धेत भिमनगर कन्नड शाळेचे मोठ गटातील मुलांचे संघ कबड्डी, खोखो आणि लंगडी या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. तसेच मोठ गटातील मुलींचा संघ देखिल खोखो आणि कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून वर्चस्व राखले.
शाळेला मिळालेल्या या अथक यशाला गटशिक्षणाधिकारी अधिकारी राजशेखर नागणसुरे , विस्तार अधिकारी रतीलाल भुसे , विस्तार अधिकारी सुहास गुरव , केंद्र प्रमुख सुरेश शटगार , म्हेत्रे प्रशालेचे प्राचार्य बसवराज हिरतोट, भिमनगर शाळेच्या मुख्याध्यापक गौतम कांबळे, मुख्याध्यापक. गुरुमोर्तेप्पा जेऊरे, मुख्याध्यापक मडिवाळप्पा तुप्पद, क्रिडा अधिकारी पोमु राठॊड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच भीमनगर येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदनचा वर्षाव केला. या यशस्वी मुलांना मुख्याध्यापक गौतम कांबळे, शरणप्पा म्हेत्रे, राजेंद्र हौदे, शांतमलय्या स्वामी, सावित्री डोंगराजे, मल्लप्पा कांबळे, मलिकजान शेख, कलावती अरसगोंड, विश्वनाथ रेऊर, विजय गायकवाड व निंगप्पा निंबाळ या शिक्षकांचा मार्गदर्शन लाभला.