मुंबई दि २५ : -मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी प्रमुखपदी परिषदेचे माजी सरचिटणीस अनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सावंतवाडी येथे केली आहे. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपेपर्यंत ही नियुक्ती असेल. मराठी पत्रकार परिषदेचे उपक्रम, कार्यक्रमांना विविध वर्तमानपत्रातून तसेच सोशल मिडियातून व्यापक प्रसिध्दी मिळेल आणि परिषदेचे कार्य जास्तीत जास्त पत्रकार आणि लोकांपर्यंत पोहचेल, यासाठी अनिल महाजन प्रयत्न करतील, असा विश्वास गजानन नाईक यांनी व्यक्त केला. अध्यक्ष गजानन नाईक आणि कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी अनिल महाजन यांचे अभिनंदन केले आहे.अनिल महाजन हे धारूर येथील लोकमतचे प्रतिनिधी आहेत. यापूर्वी परिषदेचे मराठवाडा विभागीय सचिव आणि नंतर परिषदेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.प्रसिध्दी प्रमुख हे पद प्रथमच निर्माण करण्यात येत आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी मुंबई