पुणे दि ०३ :- पुणे शहर हद्दीत नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरेगाव पार्क व येरवडा पो.स्टे. हद्दीत अमेरीकन डॉलर पाहिजे आहेत असे सांगून त्यांना बोलावन फॉरेक्स एक्सचेंज कर्मचारी कडून जबरदस्तीने अमेरीकन डॉलर चोरुन नेणाऱ्या इसमास पुणे गुन्हे शाखा, युनिट २ ने आरोपीला केले जेरबंद अशोक मोराळे साो. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे , बच्चन सिंह, पोलीस उप आयक्त, गुन्हे, डॉ, शिवाजी पवार सो, विजय चौधरी, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी गन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांना तपासाबाबत मार्गदर्शन करुन आदेश दिले होते.कि सदर आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप यांनी त्यांचे युनिट मधील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या सदर गन्हयांचा समातर तपास करीत असताना
आरोपीचे वरील गुन्हे कार्यप्रणाली प्रमाणे पणे शहर हद्दीत २ गुन्हे केल्यानतर हैद्राबाद येथे सुध्दा असे गुन्हे केले असलेची माहिती मिळाल्याने यनिट २ चे पोनि महेंद्र जगताप यांनी हैद्राबाद पोलीसांशी संपर्क साधून सदर आरोपीचे गुन्हा करण्याचे कार्यप्रणाली माहिती घेतली होती. व एकदरीत तपासाअंती आरोपीचे गुन्हे कार्यप्रणालीवरुन पुणे शहर व हैद्राबाद येथे गुन्हे करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी गुन्हा करताना प्रथम बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करत
होता. नंतर फॉरेक्स एक्सचेंज मध्ये फोन करुन ५ हजार ते ७ हजार अमेरीकन डॉलरची मागणी करुन त्यांना सर्व्हिस अपार्टमेटमध्ये बोलावत असे. नंतर डॉलर मोजण्याच्या बहान्याने ताब्यात घेवन फॉरेक्स एक्सचेंज चे एजंटचे डोळयावर पेपर स्प्रे मारुन किंवा त्याला धक्का देवून डॉलरसह रुमचा दरवाजा
बाहेरुन बंद करुन पळून जात असे. आरोपीची गुन्हे कार्यप्रणाली पहाता तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करुन शकतो हा शक्यता गृहीत धरुन पुणे शहर व हैद्राबाद मधील फॉरेक्स एक्सचेंज दुकानदारांना संपर्क करुन कोणी अशा प्रकारे फोन करुन सर्व्हिस अपार्टमेंटवर डॉलरची डिलीव्हरी मागितल्यास
पोलीसांना सुचना देण्याबाबत कळविले होते. यातील आरोपीने हैद्राबादमध्ये पुन्हा अशा प्रकारचा कॉल करुन फॉरेक्स एक्सचेंजमधून ७ हजार डॉलरची मागणी करुन त्यास सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये डिलीवरी देण्याबाबत सांगितले. व फॉरेक्स एक्सचेंज दुकानदाराने हैदाबाद पोलीसांना त्याबाबत लगेच
कळविले असता हैद्राबाद पोलीसांनी आरोपी नामे राहुल किरण गाटीया, वय ३१, रा. नेपीयन सी रोड, शांतीनगर, वाळकेश्वर, मुंबई यास सापळा लावून अटक केली.होती व त्याबाबतची माहिती पुणे शहर यनिट २ पोनि जगताप यांना मिळाल्याने युनिट २ कडील एक पथक हैद्राबाद येथे रवाना झाले व आरोपीस कोरेगाव पार्क पो.स्टे. या गुन्हयात ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान सदर आरोपीने पुण्यामध्ये कोरेगाव पार्क व येरवडा येथे गुन्हे केल्याचे कबुल केले असून त्याप्रमाणे कोरेगाव पार्क पो.स्टे. गुन्हे, युनिट २ कडून उघडकीस आणले आहेत. आरोपी वरील गुन्हयात जबरदस्तीने चोरलेले अनुक्रम ५ हजार व ७ हजार असे एकूण १२ हजार अमेरीकन डॉलर हे मुंबई येथील फॉरेक्स एक्सचेंज येथून एक्सचेंज केले असून त्याबाबत पोलिसांना आरोपीने सांगितले कि बिजनेस मध्ये झालेल्या कर्जामुळे करत होता अमेरिकन डॉलरची चोरी व’ पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट २ कडून सुरु आहे.सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सपोनि जयवंत,जाधव, पोउनि प्रतापसिंह शेळके, सपाफौ यशवंत आंब्रे, संजय दळवी, पोना अतुल गायकवाड, चेतन गोरे, स्वप्नील कांबळे, पोशि कादीर शेख, विवेक जाधव, मितेश चोरमोले यांनी केलेली आहे.