पुणे दि ०४: – पुणे शिवाजीनगर न्यायालयातील एका बेलीफासने ऑर्डर काढून देतो, असे सांगून एका व्यक्तीकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडून अटक करण्यात आली. आज दि ४ रोजी शनिवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या जवळीत पेट्रोल पंपाजवळ पैसे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे न्यायालयातच असे प्रकार वाढले असून त्यामुळे वकील वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर कांबळे असे रंगेहाथ पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जागेचा ताबा न देण्यासाठी तुम्हाला हवी तशी ऑर्डर व काढून देतो, असे सांगून कांबळे याने लाचेची मागणी केली होती.मात्र संबंधिताने ही घ़टना एसीबी अधिकाऱ्यांना कळविली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.आहे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून झालेल्या कारवाईचे पुणे बारचे अध्य़क्ष श्रीकांत अगस्ते यांनी स्वागत केले.
.