श्रीगोंदा प्रतिनिधी दि १७ : – खातेदार तसेच त्याची सही अंगठा नसताना बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून माजी पंचायत समिती उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोळगाव येथील शाखेतील व्यवस्थापक व रोखपाल यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक रोहन उबाळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिल्याची घटना गुरुवार दि.१५ रोजी घडली याबाबत उबाळे यांच्या फिर्यादीवरून प्रताप उर्फ बाळासाहेब नलगे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल झाला.आहे व दिलेल्या फिर्यादी नुसार श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे हे बबन बाबा मोहरे यांच्या समवेत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँकेच्या कोळगाव शाखेत आले व त्यांनी बबन मोहरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या खात्यातून रक्कम रुपये ७०० काढण्यासाठी पावती भरून दिली मात्र त्यावर खातेदाराचे सही किंवा अंगठा नसल्याने बँकेचे व्यवस्थापक उबाळे यांनी खातेदार समक्ष हवे किंवा आजारी असल्यास तसा वैद्यकीय दाखला द्यावा किंवा आमच्या कर्मचार्याला त्यांची सही घेण्यासाठी प्रत्यक्ष पाठवतो असे म्हंटल याचा नलगे याला राग आला व त्यांनी उबाळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बँक तुझ्या बापाची आहे का? बँकेच्या बाहेर ये तुझ्याकडे पाहतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी रोखपाल पोपट सरोदे हे मध्ये पडले असतात नलगे याने त्यांनाही शिवीगाळ करत त्यांच्यावर चप्पल उगारली. त्यामुळे सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक रोहन उबाळे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात माजी उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब नलगे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल बुधवार दि.१५ रोजी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-योगेश चंदन