पुणे दि ३० : – मामाने भाच्चीला व तिच्या प्रियकराला प्रेमप्रकरणातून सेनापती बापट रस्त्यावरून अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार सेनापती बापट रस्त्याव घडला आहे व कारमधून त्यांचे अपहरण करून नेले आहे व नागरिकांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर चतुशृंगी पोलिसांनी त्यांना पकडले आहे. तर अपहरण करणाऱ्या मामासह साथीदारांना अटक केली आहे. दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34, रा.वाघोली,सातारा), संदीप किसन जाधव (वय 28, रा.आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत (वय 26,रा.आर्डे,सातारा), सागर अनिल कोळेकर (वय 23, रा.सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय 18),शुभम नवनाथ बरकडे ( वय 20), मंगेश रमेश शिंदे, वय 21), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27, चोघेही रा.लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर, वय 23, रा.सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
याप्रकरणी ऋतिक मोहिते (वय 27, रा. पर्वती दर्शन) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण सेनापती बापट रस्त्यावरील एका कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीस आहेत. याच कंपनीतील तरुणीशी त्याचे प्रेम संबंध आहे. मात्र ही बाब तरुणीच्या वडिलांना समजली. व त्यांनी मुलीचा मामा भोईटे याला हा प्रकार सांगितला. त्यावेळी भोईटे व त्याच्या साथीदारांनी संगनमत करत शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता फिर्यादी तरुणीसोबत सेनापती बापट रस्ता येथील स्टार बाजार मार्केट येथे आयसीसी टॉवर जवळ बोलत थांबले असताना कारमधून येत फिर्यादी व तरुणीला पोलिस असल्याचे सांगुन पोलिस स्टेशनला जायचे आहे, अशी बतावणी करुन दोघाना बळजबरीने धक्काबुक्की करुन गाडीमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना पाषाण मार्गे चांदणी चौक ते बेंगलोर हायवेने कात्रज घाटा जवळ येथे घेवून गेले. तेथे फिर्यादीस मारहाण करुन गाडीतून खाली ढकलुन दिले, तसेच तरुणीला घेऊन गाडी साताराचे दिशेने गेली.
दरम्यान, नागरिकांनी हा प्रकार पाहताच नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यांनी ही माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. याबाबत खबर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे व त्यांच्या टिमने तत्काळ आरोपीचा तपास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी पहाटे साडे तीन वाजता आरोपीना सातारा टोल नाका येथे ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण पुढील तपास करीत आहेत.