नांदेड दि १९ :- बरडशेवाळा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी व कॅशियर यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभ संपन्न झाला असून येथील डी आर गायकवाड शाखा अधिकारी यांची सारखणी येथे बदली करण्यात आल्याने त्यांचे बदल्यात पी.टी पावडे यांनी पदभार स्विकारला आहे व तसेच एस.जी बाबळे यांनीही कॅशियर म्हणून नव्याने पदभऻर स्वीकारला आहे त्यावेळी पत्रकार बांधवांनी सर्वानुमते दोन्ही शाखा अधिकारी व कॅशियर यांचा सत्कार ठेवून चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नवीन शाखा अधिकारी पीटी पावडे यांनऻ तीस गावाची पेमेंट वाटपाची गरबड पाहता शाखेला अजून एक तरी कर्मचारी हवा असल्याचे शेतकरी बांधवांनी बोलताना सांगितले त्यावेळी सुनील आनेराव करमोडीकर सचिव ,कदम जी.के सेक्रेटरी, संजय जाधव सरपंच पांगरी ,भारत कापसे चेअरमन कवाना ,बबनराव बेंबरकर सावरगाव, पत्रकार विकऻस राठोड, प्रभाकर दहिभाते ,संदीप तुपकरी , शेतकरी व शाखेचे इतर कर्मचारी बी व्ही चव्हाण इन्स्पेक्टर व कंत्राटी शिपाई मुक्तार भाई सह परिसरातील तिस गावातील बरेच कार्यकर्ते उपस्थित राहुन आप आपल्या गावातील शेतकरी नुकसान भरपाई ची रक्कम कधी मिळणार विचारताना दिसत होते
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : – संदीप तुपकरी