पुणे दि १९ :- विदया सहकारी बँक सेनापती बापट रोड शाखा पुणे येथे बनावट कागदपत्र देवुन १३ लाख.५५ हजार ९३६ रुपये फसवणुक केली होती फसवणुकीच्या गुन्हयातील २२ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत असलेला आरोपी संदिप सुधाकर धायगुडे याच्या युनिट ४ गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या . अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी एमओबीकडील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असून , सदर गुन्हयातील आरोपी संदिप सुधाकर धायगुडे , वय -५३ रा .१२ ९९ सदाशिव पेठ पुणे याने त्याचे सहकारी नामे १ ) आनंद प्रभाकर गोरे रा .७२० / १७ विजय बंगला नवी पेठ पुणे सध्या राहणार अमेरीका व २ ) सुब्रतो दास रा.बी / ६ / ७ सत्यदर्शन मालवा रोड अंधेरी पुर्व मुबई यांचेसह विदया सहकारी बँक सेनापती बापट रोड शाखा पुणे येथे बनावट कागदपत्र देवुन १३ लाख.५५ हजार ९३६ रुपये घेवुन फसवणुक केली होती व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. गुन्हा केल्यापासून गेले २२ वर्षे तो पोलीसांना गुंगारा देत होता . स्वतःचे अस्तित्व लपवून ठिकाणे बदलुन रहात होता . युनिट ०४ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस कर्मचारी सचिन ढवळे यांना गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी संदिप सुधाकर धायगुडे हा शिवतिर्थनगर , कोथरुड भागात भाडयाने रहात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली . त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट -०४ , गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शशीकांत शिंदे , पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे , सचिन ढवळे , दत्तात्रय फुलसुंदर असे शिवतिर्थनगर , कोथरुड , पुणे येथे सापळा रचून २२ वर्षापासून फसवणुकीच्या गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी संदिप सुधाकर धायगुडे , वय -५३ रा .१२ ९९ सदाशिव पेठ , पुणे व सध्या राहणार माधवबाग सोसायटी , शिवतीर्थनगर , पायस बंगला नं .२५ , कोथरुड , पुणे यास पकडून त्यास गुन्हयाचे पुढील कार्यवाही करता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त.बच्चन सिंह , सहा.पोलीस आयुक्त गुन्हे – २.लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक , श्री.रजनिश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक , शशीकांत शिंदे , पोलीस उप – निरीक्षक , दिपक माने , पोलीस कर्मचारी सचिन ढवळे , रुपेश वाघमारे , दत्तात्रय फुलसंदर यांनी केली आहे .