पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत
पुणे, दि. 1- पेरणे फाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रशासनाच्या जय्यत तयारीमुळे शांततेत संपन्न झाला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गेली दोन महिने अभिवादन कार्यक्रमपूर्व तयारीच्या आढावा बैठका घेतल्या. जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून असंख्य नागरिक मोठया संख्येने आले होते. परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसचे परिसरात पुस्तके, खादयपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सामाजिक संस्थांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. नागरिकांसाठी प्रशासनाच्या वतीने पाणी, स्वच्छतागृहे तसेच पार्किंगपासून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत ने-आण करण्याकरीता पी.एम.पी.एम.एलच्या बसेस इ. सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या.