पुणे :- कौटुंबिक न्यायालयात पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याच्या पत्नीला दोन मुली आसून कौटुंबिक न्यायालयात पोटगीची रक्कम १ लाख ६६ हजार रुपयांची पोटगी थकविल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पतीला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.आहे कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.आहे दशरथ हनुमंत मळेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ६६ हजार रुपये पोटगीची रक्कम येणे बाकी होती.व पोटगी रक्कम थकविल्यामुळे त्याच्याविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात वॉरंट काढण्यात आले होते. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
पहील्या पत्नीचा घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले.होते व पहिल्या पत्नीला आणि दोन मुलींना १३ हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर यांनी दिला होता. मात्र, त्याने आदेशाचे पालन केले नाही. त्याच्याकडून पैसे भरण्यात
आले नाहीत म्हणून वॉरंट काढण्यात आले होते. अर्जदार महिलेतर्फे अॅड. मनीषा गोळे-माने यांनी पाठपुरावा केला आहे