पुणे दि १२ :- विविध खेळांमध्ये आॅलिंपिक स्पर्धेत स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी खेलो इंडिया हे उत्तम व्यासपीठ आहे, असे आंतरराष्ट्रीय नेमबाज मानवादित्यसिंह राठोड याने येथे सांगितले.
मानवादित्य हा केंद्रीय क्रीडा मंत्री व आॅलिंपिक रौप्यपदक विजेते नेमबाज राजवर्धनसिंह राठोड यांचा मुलगा आहे. त्याने येथे शनिवारी झालेल्या २१ वषार्खालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धेबाबत मानवादित्य म्हणाला, येथे विजेतेपदाची मला खात्री होती. ही स्पर्धा २०२० मध्ये टोकियो येथे होणाºया आॅलिंपिक क्रीडा स्पधेर्साठी निवड चाचणी मानली जाते. त्यामुळेच या महोत्सवात सर्वच खेळांमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. साहजिकच या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आॅलिंपिक पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी यंदा विविध जागतिक मालिकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे.
मानवादित्य हा नवी दिल्ली येथील हंसराज महाविद्याालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. येथे तो राजस्थानकडून सहभागी झाला आहे. नेमबाजी हा खेळ का निवडला असे विचारले असता तो म्हणाला, खरंतर मी शाळेत असताना फुटबॉल, बास्केटबॉल, जलतरण आदी खेळांमध्ये भाग घेत असे. तथापि फुटबॉल खेळत असताना खूप वेळा दुखापती झाल्या. त्यामुळे बाबांनी मला नेमबाजीचा सराव करण्याचा सल्ला दिला.
आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे हे प्रत्येक नेमबाजाचे लक्ष्य आहे. माझ्या बाबांनी आॅलिंपिक रौप्यपदक मिळविल्यानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माज्यावर आहे. हे लक्ष्य साध्य करणे सोपे नसले तरी ते साध्य करण्यासाठी मी भरपूर कष्ट करणार आहे असे मानवादित्य याने सांगितले. नेमबाजीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना शनिवारी एकही पदक मिळविता आले नाही.