भंडारा,दि.०३ :- वाळू माफिया ने केलेल्या हल्ल्या नंतर मोहाडी तहसीलदार यांनी स्वसौरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा या गावी घडली आहे. गोळीबार झाल्याची ही घटना जिल्ह्यात हवेसारखी पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटना स्थळी जावून पाहणी केली. तहसीलदार यांच्य तक्रारी नंतर मोहाडी येथे गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मोहाडी तहसीलदार दीप क कारंडे यांना रोहा या गावी साठवलेली वाळू जेसीपी द्वारे टिप्पर मध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी त्यांच्या चमू सह रोहा येथे प्रत्यक्षात भेट दिली असता जेसीपी द्वारे टिप्पर मध्ये वाळू घालण्याचा काम सुरू होता. तहसीलदार यांनी तो काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी, असा आवाहन जेसीबी चालकाला दिला. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्या द्वारे हल्ला चढविला मात्र तहसीलदार यांनी स्वतःचा बचाव केला, त्यानंतर जेसीपी चालकाने तिथून जेसीपी घेवून पळ काढला.
तहसीलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीव घेणा हल्ला केला. दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली लायसनधारक बंदुकीने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीपी आणि टीप्पर ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळताच सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली.
मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिपर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम 353, 379 नुसार गुन्हा नोंद केला गेला असून सध्या जेसीपी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी यावेळी सांगितले.