पुणे,दि.०४:- दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मनोहर भिडे यांनी एका महिला बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर भिडे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात भिडे यांच्या प्रतिमेला कुंकू आणि टिकली लावून आंदोलन करण्यात आला आहे. मनोहर भिडे यांनी केलेले वक्तव्य हे राज्यभरातील महिलांचा अपमान आहे. महिलांनी काय लावावे आणि काय लावू नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुंकू लावली म्हणून तुम्हाला भारत माता दिसेल नाही तर दिसणार नाही. हे जे भिडे यांचं वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान महिलांनी केलेल्या कामाचे आणि तसेच सबंध महिला आणि विधवा महिलांचा अपमान आहे. भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी संपूर्ण महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी केली आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, निता राजपूत, नंदा ढावरे, रमा भोसले, कांता ढोणे, छाया जाधव, ॲड. राजश्री अडसूळ, मोनिका खलाने, ॲड. अश्विन गवारे, मोनाली अपर्णा, मंगल निक्कम, ॲड. रेशमाताई, आयेशा शेख, सुनिल शिंदे, संदिप मोरे, प्रसन्न मोरे आदींसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.