पुणे,दि.२७:-सिंहगड रोड परिसरातील हातगाडीवाले तसेच फिरुन व्यवसाय करणारे व्यापारी व लहान मोठे व्यापारी व कामधंदा करणारे अशा स्वरुपाचा आहे. लोकांना दमदाटी करणे, गुन्हे करते वेळी हत्याराचा धाक दाखवणे, हत्यार बाळगुन दहशत निर्माण करणे, कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर हत्याराने मारहाण करुन जखमी करणे असे बेकायदेशीर कृत्य सराईतपणे राजरोसपणे केल्याप्रकरणी सिंहगड रोड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शिवराज शंकर शिंदे, वय ३४ यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणात आरोपी शिंदे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये एम.पी.डी.ए. कलमाचा अंतर्भाव केला आहे. आयुक्तांनी आजपर्यंत ८६ चालु वर्षात टोळ्यांवर एम.पी.डी.ए. कारवाई केली आहे. यांच्यावर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द अंतर्गत कारवाई केली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे शिवराज शंकर शिंदे, वय ३४ वर्षे, रा. श्रीरंग अपार्ट, फ्लॅट नं. ३०७, झील कॉलेज चौक, न-हे, पुणे व मुळगाव- ऊफळाई रोड, गोंधील प्लॉट, बार्शी, सोलापुर हा सन २०१७ सालापासुन आजपर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. त्याचेविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून, त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी वसुल करणे, गंभीर जखमी करणे, हत्याराचा धाक दाखविणे, बेकायदेशिर जमाव जमवुन दुखापत करणे, लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, बेकायदेशिर जमाव जमविणे व त्यास चिथवून लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, अग्निशस्त्र बाळगणे, आदेशांचा भंग करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरुपाच्या गंभीर गुन्हयांचा समावेश आहे.तो वास्तव्यास असलेला परिसर व आजुबाजुचा भाग हा झोपडपट्टीमध्ये येत असल्याने तेथे हातगाडीवाले तसेच फिरुन व्यवसाय करणारे व्यापारी व लहान मोठे व्यापारी व कामधंदा करणारे अशा स्वरुपाचा आहे. लोकांना दमदाटी करणे, गुन्हे करते वेळी हत्याराचा धाक दाखवणे, हत्यार बाळगुन दहशत निर्माण करणे, कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर हत्याराने मारहाण करुन जखमी करणे असे बेकायदेशीर कृत्य सराईतपणे राजरोसपणे करीत आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत आहे व त्यांची सदर भागात जबर दहशत निर्माण झाली आहे.
त्या अनुषंगाने गुन्हेगार शिवराज शंकर शिंदे यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यासाठी, अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर राजेद्र डहाळे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्रीमती पौर्णिमा गायकवाड, (तत्कालीन) पोलीस उप आयुक्त, परि ३, पुणे, सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परि ३, पुणे, सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांनी जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे महिला पोलीस आंमलदार, मिनाक्षी महाडीक, पोलीस अंमलदार स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी एम. पी. डी.ए. प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे मार्फतीने सादर करण्यात आला होता.सदर प्रस्तावाचे अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अवलोकन करून, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरिल सराईत गुन्हेगार नामे शिवराज शंकर शिंदे यास एम. पी. डी. ए. कायदयान्वये त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचा आदेश पारित केला. त्याप्रमाणे धोकादायक व्यक्ती शिवराज शंकर शिंदे यास नमुद आदेश बजावुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ८६ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.