लातूर दि,१७ :- पुलवामा येथे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून अनेक भारतीय जवानांचे प्राण घेतले. या भ्याड हल्ल्याचा आणि आंतकवादाचा निषेध रविवारी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला. याशिवाय, वसुंधरा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभर अन्न वर्जित करून स्वतःच्या घरावर काळे झेंडे बांधून निषेध नोंदवला.
पुलवामा भ्याड हल्ल्याने अवघा भारत देश हळहळला. अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याचा निषेधार्थ वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे हाताला काळ्या फिती लावून आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शिवाय, तरुणांनी रविवारी दिवसभर अन्न वर्जित करून स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून या घटनेचा तीव्र पणे निषेध नोंदवला.
या निषेधमध्ये वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, सोशल मीडिया प्रमुख रामेश्वर बावळे, सदस्य अमोल स्वामी, हुसेन शेख, अनिकेत मुंदडा, प्रशांत स्वामी, रोहित उफाडे, शुभम चव्हाण, मच्छिंद्र आमले, राम पांचाळ, अभिजित पुरी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
100 घरांवर काळे झेंडे
===============
‘त्या’भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज लातूर शहरात तरुणांनी घरांवर काळे झेंडे लावले. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी निषेध नोंदविण्यासाठी नागरिकांनी काळे झेंडे लावावेत असे आवाहन केले होते.